प्रतिनिधी / शिरोळ
पंचायत समितीच्या सभापती मिनाज जमादार यांनी आपल्या पदाचा राजीनामा यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे सादर केला मिनाज जमादार यांची 30 डिसेंबर रोजी सभापतीपदी निवड करण्यात आली होती आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे पाच महिन्याचा कार्यकाळ देण्यात आला होता पाच महिने उलटून गेले तरी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने १३ पैकी १२ सदस्यांनी आघाडीचे नेते गणपतराव पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे साकडे घातले होते श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली होती सभापती सौ मिनाज जमादार यांनी त्यावेळी आपल्या पदाचा राजीनामा गुरुवारी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याप्रमाणे त्यांनी आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला राष्ट्रवादीच्या दिपाली परीट यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
Previous Articleकोल्हापूर : सायंकाळी सहा पर्यंत २७ रिपोर्ट पॉझिटिव्ह
Next Article नरतवडेत एक युवक कोरोना पॉझिटिव्ह








