प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती मिनाज जमादार यांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्यास त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान सभापती सौ मिनाज जमादार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी पंचायत समितीच्या 12 सदस्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची भेट घेऊन सभापती मिनाज जमादार यांना राजीनामा देण्यासाठी आदेश देण्याची विनंती केली. चेअरमन गणपतराव पाटील यांनी राजीनामा दिल्यास नव्याने निवडीस कोणती अडचण येणार का याबाबतची कायदेशीर माहिती घेऊ व तशी कोणतीही अडचण येणार नसल्यास येत्या मंगळवारी राजीनामा देण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले दरम्यान शिरोळ तालुका पंचायत समितीमध्ये 14 पैकी 13 सदस्य संख्या आहे. शिरोळ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषद झाल्याने भाजपचा एकमेव सदस्या असलेल्या योगीता कांबळे यांचे पद रद्द झाले आहे.
30 डिसेंबर 20 19 रोजी मिनाज जमादार यांची सभापतीपदी निवड करण्यात आली होती सर्व सदस्यांना संधी मिळावी यांकरिता पाच महिन्याचा कार्यकाळ देण्यात आला होता सहा महिने उठून गेले तरी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने सदस्याच्यामधे असंतोष पसरला आहे. आघाडीचे नेते गणपतराव पाटील यांना विद्यमान उपसभापती मल्लू खोत सदस्य सचिन शिंदे सुरेश कांबळे संजय माने मन्सूर मुलाणी सौ कविता चौगुले सौ मीनाक्षी कुरडे सौ रूपाली मगदूम सौ दिपाली परीट राजगोंडा पाटील सौ अर्चना चौगुले आदींनी भेट घेतली गणपतराव पाटील यांनी माहिती घेऊन राजीनामा देण्याचा आदेश देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.
येत्या सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचे सचिन शिंदे यांनी सांगितले तालुका पंचायत समितीमध्ये काँग्रेस, तीन राष्ट्रवादी काँग्रेस, तीन स्वाभिमानी शेतकरी संघटना, चार व शिवसेना दोन अशी सदस्य संख्या असून विद्यमान सभापती मिनाज जमादार यांनी राजीनामा दिल्यास आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या दिपाली परीट यांची सभापतीपदी निवड होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








