प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ नृसिंहवाडी मार्गावरील तारा पेट्रोल पंपानजिक अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल उत्तम पवार वय 33 व अमोल बबन लंगरे दोघे राहणार धरणगुत्ती हे दोघे जखमी झाले आहेत. याबाबतची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे. या अपघाताची फिर्याद अमोल पवार यांनी दिली.
सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी अमोल पवार हे आपले मित्र अमोल लंगरे यांना घेऊन दुचाकीवरून नरसिंहवाडीला जात होते. यावेळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अधिक तपास पोलीस हवालदार धुमाळ हे करीत आहेत.









