प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझे जबाबदारी ही शासनाची मोहीम यशस्वी करण्यासाठी शिरोळ तालुक्यात ग्रामीण भागात 136 तर शहरी भागात 68 पथके नियुक्त करण्यात आली असून याची पहिल्या टप्प्यातील सुरुवात उद्या मंगळवार 15 सप्टेंबर पासून करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ व गटविकास अधिकारी शंकर कवीतके यांनी संयुक्त पत्रकार बैठकीत दिली आहे।
त्या म्हणाल्या की शिरोळ तालुक्यात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी यासाठी शासनाने लोकसहभागातून माझे कुटूंब माझे जबाबदारी ही मोहीम सुरु केली आहे ही मोहीम दोन टप्यात राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 अक्टोम्बर तर दुसरा टप्पा 14 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर असा राहणार आहे. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य स्वयंसेवक अशावर्कर यांच्या सहभागातून प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे. शिरोळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोणतीही मनात शंका व भीती न बाळगता या आरोग्य मोहिमेत सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ यांनी शेवटी बोलताना केले.
यावेळी बोलताना जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ नीता माने म्हणाल्या वैद्यकीय सल्ला वेळेत उपचार घेतले तर कोरोना बरा होऊ शकतो मला कांहीं होणार नाही या संभ्रमात राहू नका कोरोना विरुद्ध लढा जिकण्यासाठी लोक सहभाग शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सभापती कविता चौगुले, उपसभापती सचिन शिंदे, जि प दादेपाशा पटेल, प स सदस्स सदस्य मलाप्पा चौगुले तालुका आरोग्य अधिकारी डॉ पी एस दातार प स सदस्या मिनाज जमादार अर्चना चौगुले,मन्सूर मुल्लाणी, आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









