प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. शिरटी व मजरेवाडी या दोन गावच्या आरक्षण वगळून आणि 31 गावच्या सरपंच पदाची निवड ठरलेल्या नऊ फेब्रुवारी होईल. असे वाटत असतानाच तालुक्यातील सर्व 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका 16 फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शिरोळ तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच काढण्यात आले. या आरक्षणाविरोधात शिरटी येथील नुतन ग्रामपंचायत सदस्य भंडारे यांनी सरपंच पदांसाठी काढण्यात आलेले आरक्षण हे चुकीचे असुन त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने शिरटी व मजरेवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी स्थगिती दिली होती.
शिरोळ तालुक्यातील नुकत्याच झालेल्या 33 ग्रामपंचायती पैकी 31 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदासाठी नऊ फेब्रुवारी रोजी निवडी होतील असे वाटत असताना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवड या सोळा तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आले असल्याचे स्पष्ट झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.
या तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या पैकी बहुसंख्य नूतन सदस्यांना दगाफटका होऊ नये म्हणून सहलीवर पाठवण्यात आलेले आहेत. पुन्हा सोळा तारखेपर्यंत सरपंच पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने इच्छुकांची घालमेल वाढली असून आहे. ती सरपंच पदाचे आरक्षण राहणार की पुन्हा नव्याने सोडत होणार चर्चा रंगली आहे.