प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील बहुसंख्य गावात जोरदार पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांत समाधान वातावरण पसरले असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.
गेले चार दिवस झाले तालुक्यांमध्ये प्रचंड उष्मा वाढला होता सकाळपासून कडक ऊन पडले होते. दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ढग दाटून येऊन पावसाला सुरुवात झाली दमदार पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गातून समाधानाचे वातावरण पसरले आहे. सध्या मशागतीची कामे सुरू आहेत.
भुईमूग सोयाबीन उडीद मूग या कडधान्याबरोबरच ऊस पिकास हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता एक सारखा पाऊस पडत होता.









