प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी त्याला पायबंद बसण्यासाठी शहरातील सायंकाळी सात ते रात्री 10 वाजेपर्यंत स्ट्रीट लाईट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 3 दिवस कडकडीत बंद एक दिवस अत्यावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली
गेले दीड महिना झाले शिरोळ शहरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले असल्याने करोना विषाणू प्रतिबंधक करण्यात यश मिळाले आहे. असे असले तरी अद्याप संकट टळलेले नाही पुर्वीप्रमाणे सहकार्य करावे असे सांगून येत्या 17 तारखेपर्यंत लॉक डाऊन पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले. तसेच बाहेरील भाजी विक्रेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही. शहरातील भाजी विक्रेत्यांनी घरोघरी जाऊन भाजी विक्री करावी एका ठिकाणी राहून भाजीविक्री केल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्याधिकारी तैमुर मुलांणी यांनी करून शहरातील मयत झालेल्या व्यक्तींचा मृत्यूचा दाखला घरपोच देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस माजी खासदार यांच्यासह पदाधिकारी व सर्व नगरसेवक, दक्षता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.