शिरोळ/प्रतिनिधी
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरांमध्ये बाहेरगावाहून खरेदी अथवा विक्री करण्यास मनाई करण्यात आली असून कुणी या नियमाचा भंग केल्यास दोन हजार रुपयाे दंडात्म कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. 31 मे पर्यंत दोन दिवस लोकडाउन तिसऱ्या दिवशी सकाळी सात ते एक वाजेपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवा या मधुन वगळण्यात आले.
शिरोळ नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्याधिकारी तैमूर मुलांनी यांनी करून बाहेरून येणाऱ्या लोकांना श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पॉलिटेक्निकल कॉलेज व डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वस्तीग्रह ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातून अथवा परराज्यातून येणाऱ्या लोकांना ज्याच्या त्यांच्या गावात संस्थापक विलिनीकरण केंद्रात पाठवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील व्यापारी बांधवानी नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी नियमचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त चे संचालक अनिल राव यादव, उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे, दिलीप राव पाटील, जि.प. सदस्य अशोकराव माने यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleहोम क्वारंटाईनचा शिक्का मारूनही नागरिक मोकाट
Next Article आजपर्यंत ६४ पोलीस होमक्वारंटाईन- डॉ. अभिनव देशमुख








