पुलाची शिरोली / वार्ताहर
शिरोली औद्योगिक वसाहतीतील कर वसुली पूर्ववत ग्रामपंचायतीकडे देण्याचे मागणीचे निवेदन शिरोली ग्रामपंचायतीने ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले आहे. याबाबत औद्योगिक विकास महामंडळ अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांची बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन दिले.
चालू आर्थिक वर्षापासून औद्योगिक वसाहतीतील कर वसुली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करुन संपूर्ण कर औद्योगिक विकास महामंडळाकडे जमा करावेत. असा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. परिणामी विकास कामांना खीळ बसली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कर वसुली पूर्ववत ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, सरपंच शशिकांत खवरे उपसरपंच सुरेश यादव ,महेश चव्हाण, उत्तम पाटील, विठ्ठल पाटील, बाजीराव सातपुते, सतिश रेडेकर आदी उपस्थित होते.
Previous Articleसांगली : घाबरून न जाता धैर्याने या परिस्थितीचा मुकाबला करू
Next Article सांगली जिल्ह्यात नवे 277 रुग्ण, तर 546 कोरोनामुक्त









