बेळगाव / प्रतिनिधी
उद्योजक शिरीषराव गोगटे यांच्याकडून पोलिस प्रशासनाला मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. 200 एन95 मास्क व 5 लिटर सॅनिटायझर पोलिसांना देण्यात आले. डीसीपी चंद्रशेखर निलगार यांच्याकडे हे साहित्य देण्यात आले.
उद्योजक शिरीषराव गोगटे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. यापूर्वीही त्यांनी अनेकांना मदत केली आहे. तसेच उत्तम सेवा बजाविणाऱया सरकारी कर्मचाऱयांनाही त्यांनी बक्षिसे दिली आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाकाळात उत्तम सेवा बजाविणाऱया पोलिसांना मास्क व सॅनिटायझर दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत हॉटेल मेरीएटचे जनरल मॅनेजर विनायक पाटणेकर उपस्थित होते.









