शिराळा / वार्ताहर
राज्याच्या जलसंपदा व नगर विकास विभागकडून शिराळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा विकास निधी आणला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. ते म्हणाले, शिराळ्याचा सर्वांगणी विकास साधण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी सातत्याने निधी देत आलो आहे. शिराळा हे तालुक्याचे व तालुक्यातील सर्वांत मोठे ठिकाण असल्याने येथील नागरीकांना उत्तम सोई, सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहीला आहे.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, उप जिल्हा रुग्णालय इमारत, बस स्थानक इमारत, विद्यार्थी वस्तीगृह, अंबामाता मंदिर परिसर सुशोभिकरण, पर्यटन विकासमधून अंर्तगत रस्ते, नवीन पाणी योजना, तिर्थक्षेत्र विकास अ व ब वर्गात विविध मंदिरांचा समावेश करणे, विविध समाजासाठी सामाजिक सभागृह, व्यायाम शाळा, सांस्कृतिक सभागृह बांधणे, बस स्थानक ते पंचायत समितीपर्यंत पदपथ, भूयारी रस्ता, शिराळ्याजवळ विस्तारणाऱ्या विविध वसाहतीमध्ये रस्ते, पाण्याच्या सोय, दिवाबत्ती आदी सुविधा पुरविणे आदी कामे नगरपंचायतीला बरोबर घेवून केली आहेत.