शिराळा/प्रतिनिधी
शिराळा येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्तेआज वारणा काठच्या गावाना यांत्रिकी बोटी प्रदान करण्यात आल्या. शिराळा पंचायत समिती आवारात यांत्रिकी बोटी प्रदान कार्यक्रम झाला. पूरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेमार्फत या बोटी देण्यात आल्या आहेत. बोटी वारणा नदीकाठावरील आरळा, कोकरूड आणि सागाव गावासाठी देण्यात आल्या.
,यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक, संपतराव देशमुख, सभापती वैशालीताई माने, उपसभापती पी. वाय. पाटील, माजी सभापती व प. स. सदस्य सम्राटसिंग नाईक, हणमंत पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पंचायत समिती सदस्य अमर पाटील, माजी सभापती मायावती कांबळे, दिनकर दिंडे, भीमराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.








