प्रतिनिधी / शिराळा
शिराळा तालुक्यात कालपासून सुरू झालेल्या, संततधार पावसाने बळीराजा सुखावला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली होती. याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील डोंगरी भागातील भातशेतीला बसला. आता मात्र गणेशोत्सवापुर्वी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
तालुक्यातील बहुतेक भागात पावसाने हजेरी लावली असून यामूळे भुईमूग, भात, सोयाबीन यांसारख्या खरीप पिकांंना वाढ होण्यासाठी याची चांगलीच मदत होणार आहे. नदी काठाच्या भागात पिकांना कृत्रिमरित्या पाण्याची सोय होऊ शकते. मात्र कोरडवाहू पिकांना याची धळ बसणार होती. ती या पावसामूळे बसणार नाही. त्या सोबत पिकांच्या वाढीसाठी ही चांगली मदत होणार आहे.