प्रतिनिधी / शिरोळ
खाजगी आयशर गाडीमध्ये चढत असताना तोल जाऊन पडल्याने जयपाल तातोबा कोगनोळे( वय वर्ष 50) राहणार शिरटी (ता शिरोळ) यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना दररोज शिरटी शिरोळ धरणगुत्ती येथील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना आयशर गाडीतुन आनने व सोडणे नेहमीप्रमाणे काम आटोपून शिरटी कडे येत होते धरणगुत्ती येथील लंगरे मळ्या जवळ सहा महिला कामगार उतरल्या त्याच वेळी मयत जयपाल कोगनोळे हे लघुशंकेसाठी उतरले होते लघुशंका करून आयशर गाडीत चढत असतानाच आयशर चालक चंद्रकांत रघुनाथ कोगनोळे राहणार शिरटी याने भरधाव वेगाने गाडी चालल्यामुळेजयपाल कोगनोळे याचा तोल जाऊन पडल्याने ते जागीच ठार झाले. याबाबतची फिर्याद शैलेश महावीर सूर्यवंशी यांनी पोलिसात दिली असून पोलिसांनी चालक चंद्रकांत कोगनोळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.