शिरगाव / वार्ताहर
राधानगरी तालुक्यातील शिरगाव ते राशिवडे खुर्द ( बेले ) दरम्यान अज्ञात इसमांनी धूम स्टाईलने विधवा महिलेचे अंदाजे पावणेदोन लाख रुपये किंमतीचे सोने हिसकावून घेऊन केले लंपास त्यामुळे शिरगाव राशिवडे खुर्द ( बेले )परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या मध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे .
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की खिडीं व्हरवडे (ता राधानगरी) येथील विधवा महिला श्रीमती बेबीताई शामराव खांडेकर (वय 60 )या कोरोना काळात वाहतूक व्यवस्था बंद असल्याने राशिवडे खुर्द( बेले ) येथील आपले भाऊ एकनाथ गोपाळ पाटील यांच्या डोळ्याचे ऑपरेशन केले म्हणून त्यांना पाहण्यासाठी त्या शिरगाव ते राशिवडे खुर्द ( बेले ) केवळ एक किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याने पायी चालत जात होत्या. दुपारची वेळ असल्याने त्या एकट्याच चालत जात असल्याचे पाहून अज्ञात दोन इसमांनी मोटरसायकलवरून तिच्या पाठीमागून व्हरकट शेताजवळील ओढया शेजारी कोल्हापूरला जाण्याचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने खाली उतरून त्यांनी त्या विधवेस धक्काबुक्की करून तोंड दाबून व तोंडावर मारून गळा दाबण्याचा प्रयत्न केला व गळ्यातील चार तोळयाचे सोन्याचे चिताक, दोन तोळे वजनाचा लक्ष्मी हार व एक तोळ्याची मोहन माळ असे अंदाजे सात तोळे सोने हिसडा मारून काढून घेऊन गेलेत याबाबत राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार शेख करत आहेत .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









