डिचोली/प्रतिनिधी
शिरगाव गावातील सुमारे 371 घरांच्या पाण्याच्या बिलांचा सुमारे 20 लाख रुपयांचा बिलांचा भरणा तीन खाण कंपनीने न भरल्याने पाणी पुरवठा खात्याने नळजोडणी तोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच निषेध करताना ग्रामस्था?नी कंपनी व्यवस्थापनच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत पैरा येथील खनिज ई लिलाव केलेली वाहतूक अडवून धरली.
त्यानंतर डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी शिष्टमंडळाची उपजिल्हाधीकारी सचिन देसाई यांच्या सामवेत संयुक्त बैठक घेऊन याबाबत तात्पुरता तोडगा काढला असून उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत पाण्याची जोडणी तोडणार नाही. अशी हमी देताना या प्रश्नी सर्व ती चौकशी करून लवकरच आढावा बैठक घेण्याचे आदेश दिले. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व गावकऱयांनी या प्रश्नी थोडे दिवस गप्प बसताना प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला.
उपलब्ध माहितीनुसार शिरगावातील सुमारे 371 घरांची पाण्याची बिले तीन खाण कंपन्या भरत होत्या. मात्र मार्च 2018 पासून आजपर्यंत एकही बिल भरणा करण्यात आलेले नाही. त्यामुळे? पाणी पुरवठा खात्याने यासंबंधाची नोटीस बजावताना नळजोडणी तोडण्याच्या नोटिसा बजावू?न नळजोडणी तोडण्याची तयारी
सुरु केली आहे.
यामुळे संतप्त झालेल्या गावकऱयांनी आज सकाळी 11 वाजता पैरा येथे जमून खाण मालाची वाहतूक रोखून धरली व आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर वाहतूक करण्यास देणार नाही, असा पवित्रा घेतला.
या वेळी सरपंच सदानंद गावकर, विश्व?भर गावकर यांच्यासहा सुमरे 250 महिला व पुरुष उपस्थित होते.
यानंतर पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्याकडे शिष्टमंडला पाठवून बैठक घेतली.
बैठकीत सरपंच सदानंद गावकर, विश्व?भर गावकर, अमित गावकर यांनी आपल्या व्यथा मांडल्या, व आमच्या अनेक समस्या असून सतत खाण कंपन्या डोळेझाक करतात. आज 20 लाख रुपयांची पाण्याची बिले थकली असून त्यामुळे? लोक अडचणीत आलेले आहेत. जो पर्यंत सर्व बिले फेडली जात नाहीत, तोपर्यंत वाहतूक करता येणार नाही, असाही पवित्रा गावकऱयांनी घेतला. यावेळी कंपनी अधिकारी तसेच गावकरी सरपंच यांच्याशी सचिन देसाई यांनी बराच वेळ चर्चा केली व या प्रश्नी तातडीने लक्ष घलून जिल्हाधिकासारी व संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून पुढील बैठक निश्चित करण्याचे सांगितले. तसेच पाण्याच्या बिलाबाबत सरकारी अधिकारी वर्गाला पुढील आदेशा पर्यंत कसलीच कारवाई करू नये असे आदेश दिले.
उपलब्ध माहितीनुसार चौगुले कंपनी 50 टक्के तसेच सेसा व बांदेकर प्रत्येकी 25 टक्के रक्कम पाणी बिलापोटी भरणा करीत होती. मात्र 2018 मार्च पासून हि रक्कम थकलेली असून बिलांचा भरणा न केल्याने पाणी पुरवठा खात्याने नोटिसा बजावल्या होत्या.
सरपंच सदानंद गावकर यांनी सांगितले की, खाण कंपन्या अनेक आश्वासने देतात मात्र त्यां?ची पूर्तता होत नाही. पाणी पुरवठय़ाच्या बाबत बिलांचा भरणा वर्षभर केला नाही. त्यामुळे सुमारे 20 लाखांची बिले भरायची असून कनेक्शन तोडण्याची तयारी सुरु झाल्याने हा पवित्रा घेण्यात आला. बीलांची पूर्ण रक्कम भरण्यात यावी तसेच आमच्या अनेक मागण्या असून त्यां?चीही पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सदानंद गावकर यांनी उपजिल्हाधिकाऱयांकडे केली.
विश्व?भर गावकर यांनी, कंपनीने सतत गावातील लोकांना झुलत ठेवले असून कोर्ट कचेऱ्य करून आम्हाला न्याय मिळवावा लागत आहे. आता जोपर्यंत आमच्या समस्या सुटत नाहीत तो पर्यंत आम्ही वाहतूक करू देणार नाही असा पवित्रा घे?तला. मात्र उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी आपण सर्व बाबतीत पूर्ण लक्ष घलून टप्याटप्याने प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण सहकार्य करू, अशी हमी दिली. त्यामुळे लोकांना विचारून तात्पुरते आंदोलन स्थगित ठेवण्यात आले असून लवकरच ग्रामस्था?ची विशेष बैठक घेऊन या बाबत आढावा घेणार आहे असे सांगण्यात आले.









