वार्ताहर / शिये
शिये ता.करवीर येथे वाढीव वीजबिलांबाबत निषेध व्यक्त करत वीजवितरण कार्यालयासमोर बीलांची होळी केली. वाढीव बिल कमी करावे या मागणीचे निवेदन शिये वीज उपकेंद्राचे अधिकारी श्री.नरळे यांना दिले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
शियेतील महावितरण कार्यालयातून येथील ग्राहकाला एप्रिल, मे व जून या तीन महिन्याची वाढीव विज बिले दिली आहेत. वीज नियामक मंडळाने १ एप्रिल पासून विजेचे दर प्रति युनिट मध्ये वाढ केली आहे.स्थिर आकार ९० रुपये वरुन १०० रूपये करण्यात आला आहे.तर वीज दर १०० युनिट पर्यंत ३.०५ पैसे वरुन ३.४६ पैसे इतका केला आहे. तर वहन आकार १.२८ पैशावरुन १.४५ पैसे इतका केला आहे.याचा एकत्रित परिणाम म्हणून तीन महिन्यांची वीजबीले वाढुन आली आहेत. हि वाढीव वीज बिले कमी करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे उत्तम पाटील, भाजपाचे उत्तम पाटील, बाबासो गोसावी, के.बी खुटाळे, उत्तम पाटील,आनंदा पाटील, दगडू पाटील आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









