शिये / वार्ताहर
शिये (ता. करवीर) येथील शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यमार्गावर क्रशर परिसरात पडलेल्या खड्ड्यात प्रतीकात्मक वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. तसेच संबंधित विभागाने तात्काळ खड्डे न मुजवल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी दिला.
“राज्यमार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक” या मथळ्याची बातमी दैनिक तरुण भारत मधून २० जुलै रोजी प्रसिद्ध झाली होती. सदर वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मुरमीकरण व खडीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही खड्डे मुजवले नसल्याने गुरुवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, बाबासो गोसावी, धनाजी चौगले, के. बी. खुटाळे, संदीप माळी, संदीप पाटील (भैय्या), तानाजी चव्हाण, महादेव चोपदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









