प्रतिनिधी/ पणजी
शिमगोत्सवातील चित्ररथ आणि रोमटामेळ मिरवणुकीची वेळ वाढवून रात्री 11.30 पर्यंत करावी, अशी मागणी राज्यातील चित्ररथ मंडळांनी केली आहे. काल याबाबत प्रमुख पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन वेळ वाढविण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी वेळ वाढविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सूरज परब यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे रात्री 10 वा. पर्यंत मिरवणूक संपवावी, अशी सूचना होती. त्यामुळे या मंडळ प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मिरवणुकीसाठी वेळ वाढविण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी रात्री 11 वा. पर्यंत वेळ देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला, असे परब यांनी सांगितले.