नवी दिल्ली
ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स कंपनी शिपरॉकेटने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी बी टू बी लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्मवर रॉकेटबॉक्सचे अधिग्रहण केले आहे. मात्र सदरच्या अधिग्रहणाच्या किमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. कंपनीने याआधी ग्राहकांच्या डाटासंबंधातील प्लॅटफॉर्म(सीडीपी)विज्गो टेकमध्ये 75 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.
रॉकेटबॉक्सचे संस्थापक शिपरॉकेटच्या नेतृत्वासाठी पुढाकार घेणार आहेत. कार्गो व्यवहाराला मजबुती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. व्यावसायिकांच्या कार्गो वाहतुकीबाबत येणाऱया समस्यांचे आकलन करून तांत्रिक दोशांचे निवारण करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जाणार आहेत. रॉकेटबॉक्स व शिपरॉकेट यांच्याकडे उत्तम तंत्रज्ञान, कार्गो भागीदार तंत्रज्ञ आणि शिपिंगचा येणारा कमी खर्च यामुळे ग्राहकांना चांगल्या सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिपरॉकेट गेल्या काही वर्षापासून विविध ब्रँडस्च्या कंपन्या, ऑनलाइन रिटेलर्स यांना मालवाहतुकीच्या बाबतीत उत्तम सेवा देत आली आहे.
ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करणार
ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जाणार आहेत. मालाचा लवकर, सहीसलामतपणे पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे शिपरॉकेटचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल गोयल यांनी स्पष्ट केले आहे.









