वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताचा सलामीवीर शिखर धवनला या सामन्यावेळी खांद्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. नंतर त्याला क्ष-किरण तपासणीसाठी हॉस्पिटलला नेण्यात आले होते.
त्याच्या दुखापतीचा आढावा घेतल्यानंतर तो या सामन्यात पुढे भाग घेणार की नाही हे ठरविले जाईल, असे बीसीसीआयने सांगितले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजी सुरू असताना पाचव्याच षटकावेळी फिंचचा एक फटका सूर मारून पकडण्याचा प्रयत्न करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याने मैदान सोडले आणि नंतर तपासणीसाठी त्याला नेण्यात आले. त्याच्या जागी यजुवेंद्र चहलने क्षेत्ररक्षण केले. दुसऱया वनडे सामन्यावेळीही पॅट कमिन्सचा उसळता चेंडू त्याच्या बरगडय़ांना लागला होता. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी मैदानात उतरला नव्हता.