कोल्हापूर/ प्रतिनिधी
जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदांवरील पदोन्नोतीची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली. कोरोना प्रादुर्भाव होवू नये म्हणून टप्याटप्याने ही प्रक्रिया 3 दिवस करण्यात आली. विस्तार अधिकारी पदोन्नोती प्रक्रिया 11 ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्यामध्ये सेवा ज्येष्ठता व बी.एड शैक्षणिक अर्हताधारक शिक्षकांची सेवाजेष्ठता विचारात घेवून 12 जणांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नोती देण्यात आली. तसेच मुख्याध्यापक पदोन्नोती प्रक्रिया 12 व 14 ऑगष्ट रोजी करण्यात आली असून यामध्ये सेवाजेष्ठतेनुसार एकूण 83 शिक्षकांची पदोन्नोतीने नियुक्ती देण्यात आली.
ही पदोन्नोती प्रक्रिया सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसमोर समुपदेशाने जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे दर्शवून करण्यात आली. तसेच पदोन्नोतीचे नियुक्ती आदेशही त्याच ठिकाणी वितरीत करण्यात आले. त्यामुळे पदोन्नोती स्विकारलेल्या सर्व शिक्षकांनी पारदर्शक प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले.
सदरची पदोन्नोती प्रक्रिया यशस्वी व पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षक संघटना व समन्वय समितीने शिक्षण समिती सभापती प्रविण यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांचा सत्कार केला. यापुढीलही शिक्षकांच्या उर्वरीत पदोन्नोती प्रक्रिया लवकरात लवकर करणार असलल्याचे सभापती प्रविण यादव यांनी सांगीतले.यावेळी शिक्षक समन्वय समितीचे मोहन भोसले, राजाराम वरुटे, संभाजी बापट, प्रसाद पाटील, तानाजी पोवार, नामदेव रेपे, सतिश बरगे, जयवंत पाटील आदी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleरशियाची कोरोना प्रतिबंधक लस आणि त्यावरील विवाद
Next Article ठाकरे-पवारांच्या नातवांवर फोकस!









