कुंभोज / वार्ताहर
कुंभोज (ता. हातकणंगले) येथे शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने रयत पब्लिक स्कूल व डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील फाउंडेशन कुंभोज यांच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी कुंभोज एसटी स्टँड परिसरातील डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कुंभोज, फौजी संघटना कुंभोज कर्मवीर फाउंडेशन कुंभोज, रयत शिक्षण संस्था, कुंभोज आदींच्या वतीने डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायत कुंभोज येथील फोटोचे पूजन सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दावीत घाटगे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने कुंभोज गावचे सुपुत्र व शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच यावेळी गणेश उस्तव काळात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने आदर्श गौरी देखावा, तसेच माझं मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतील महिला विजेते व गावातील तरुण मंडळांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील फाऊंडेशनचे सदस्य राजू भोसले यांचा सत्कार ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने तसेच डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील फाउंडेशनचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आदित्य ग्रुप कुंभोज, आकर्षक गौराई देखाव्याचे प्रथम क्रमांकाचे मानपत्र धनश्री अर्जुन हराळे यांना देण्यात आले. यावेळी रयत गुरुकुल शिक्षिका मुसळे मॅडम यांनी तयार केलेल्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण हातकणंगले तालुका पंचायत समितीचे सभापती प्रकाश पाटील सरपंच माधुरी घोदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, कर्मवीर भाऊराव पाटील जिल्हा बँक जयसिंगपुरचे चेअरमन अनिल भोकरे, महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दावीद घाडगे, प्रकाश पाटील ,सीबी पाटील, मसूटगे सर, पी बी पाटील, अजीत देवमोरे,सदाशिव महापुरे,कलगोड पाटिल, भारती पोतदार, शुभांगी माळी, पद्मावती पाटील, रावसाहेब पाटील, भरत भोकरे, अशोक आरगे, लखन भोसले, अनिकेत चौगुले, आप्पासाहेब पाटील, विनायक पोद्दार, प्राचार्य सागर माने, भरत भोसे, सुशांत पाटील, राजू भोसले, जालिंदर कोळी तसेच ग्रामस्थ आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व कर्मवीर फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.