सांगरूळ /प्रतिनिधी
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रलंबित असलेले विविध प्रश्न व अनेक आव्हाने आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होण्याची गरज आहे. यासाठी शिक्षण क्षेत्रातील संबंधित सर्व घटकांची व्यापक बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून या प्रश्नांची सोडवणूक करणार अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री विश्वजीत कदम व आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.
यावेळी राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर व आव्हानांबद्दल सविस्तर चर्चा झाली.आमदार आसगावकर यांनी शरद पवार यांना शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न व अडचणी मांडल्या. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेहमीच सकारात्मक निर्णय घेईल. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित असलेले सर्व प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी लवकरच शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांची व्यापक बैठक घेऊ मी स्वतः या बैठकीस उपस्थित राहीन, अशी ग्वाही आमदार आसगांवकर यांना दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









