सांगरूळ / प्रतिनिधी
विधान परिषदेत पुणे विभागातील शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत आहे. या पदावर काम करण्याची संधी देण्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांबरोबरच परिसरातील ग्रामस्थांचे महत्वपूर्ण योगदान आहे. याची जाणीव ठेवून शिक्षणक्षेत्रा बरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठीही निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी दिली. सांगरुळ (ता करवीर) येथे आमदार प्रा जयंत आसगावकर यांच्या फंडातून मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपये खर्चाच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते .अध्यक्षस्थानी सरपंच सदाशिव खाडे होते .
यावेळी बोलताना आमदार आसगांवकर यांनी विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.या पाचही जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनाआमदार फंडातून शैक्षणिक साहित्यदेण्याचे काम सुरू आहे .याशिवाय सत्ताधारी महाविकास आघाडीचा आमदार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांना गावातील विकास कामांसाठी पाच कोटीचा निधी पहिल्याच वर्षी दिला आहे असे सांगितले .सांगरुळ गावात विकास कामांबरोबरच ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध असून भविष्यात गावाला विकास कामात झुकते माप देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली .
सुरुवातीस स्वागत उपसरपंच सुशांत नाळे यांनी केले प्रास्ताविक करताना पांडुरंग सोसायटीचे संचालक एस एम नाळे यांनी आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीना निधी देण्याचे काम हे सुरू असल्याचे सांगितले. यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, कुंभीचे व्हा. चेअरमन निवास वातकर, बाजीनाथ खाडे ,शिवाजीराव खाडे, कृष्णात खाडे विलास नाळे, कृष्णात चाबूक सचिन नाळे सरदार खाडे आनंदराव कासोटे सदाशिव कासोटे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.