बेंगळूर :
राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी 5 ऑक्टोबर रोजी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन झाले होते. शनिवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे ते उपचारासाठी बेंगळूरच्या जयनगर येथील बीआयजी इस्पितळात दाखल झाले आहेत. आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती सुरेशकुमार यांनी स्वतः दिली होती. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन होऊन घरीच उपचार घेत होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली नाही. उलट प्रकृती खालावत असल्याने ते अधिक उपचारासाठी इस्पितळात दाखल झाले आहेत.









