वारणानगर / प्रतिनिधी
भाजपा – जनसुराज्य आघाडीतून शिक्षक मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांच्याकडे केली आहे.
शिवाजीराव मोरे यांची राजकिय पार्श्वभूमी नसताना जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून सातवे जिल्हा परिषद मतदार संघातून सन २०१७ मध्ये “धनशक्ती विरुद्ध जनशक्ती” अशा अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. सद्या ते पक्षाचे पक्षप्रतोद असून तेथील कामगिरीद्वारे आपले कार्य ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची स्वत:ची शिक्षण संस्था असून मी गेली २४ वर्षे या संस्थेत शिक्षक म्हणून सेवा बजावत असल्यामुळे, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, तसेच स्वयंअर्थसहाय्यित व इतर सर्व प्रकारच्या खाजगी शाळांच्या मूलभूत प्रश्नांची माहिती आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींची त्यांनी सखोल प्रश्नावली तयार करून त्यावरील उपचारात्मक उपायांची संहिताही तयार केली आहे. पुणे विभागामध्ये ६५ हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी पुर्ण झालेली असून कोल्हापूर मध्ये १२ हजारा पर्यंत मतदारांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.
भाजपा – जनसुराज्य आघाडीकडे सद्या पदवीधर मतदार संघातील उमेदवारीस रस्सीखेच आहे. तथापी शिक्षक मतदार संघासाठी आघाडीच्या माध्यमातून प्रबळ उमेदवार शिवाजीराव मोरे यांच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात आल्यास अटीतटीची लढत या मतदार संघात पहायला मिळणार आहे.
Previous Articleरशिया करणार अंतराळात चित्रीकरण
Next Article सोलापूर : ‘ठाकरेंनी पाच वर्ष सरकार चालवून दाखवावे’









