प्रतिनिधी / खेड
राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनानिमित्त शिक्षक भारतीच्यावतीने आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी १० व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहे.
शिक्षकांसाठी प्रार्थना वाचन गायन स्पर्धा, बाल व कुमार वयोगटातील मुलांसाठी संस्कारक्षम व मूल्यांवर आधारित कथालेखन स्पर्धा, सचित्र कविता स्पर्धा, मला समजलेली भारतीय संविधानाची प्रास्ताविका आदी लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २००० रूपये, १५०० रूपये, १००० रूपये व उत्तेजनार्थ ५०० रूपये तसेच सन्मानपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ डिसेंबरपर्यंत स्पर्धाप्रमुख संजय शिंदे ९८९२२७६८३१, राधिका महाकाळ ९७६९५१३०३०, राम अहिवले, मारूती शेरकर यांच्या व्हॉटस्अँप क्रमांकावर स्पर्धकांनी प्रवेशिका पाठवाव्यात. स्पर्धेत शिक्षकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष प्रा. जयवंत पाटील, कार्यवाह मारूती शेरकर यांनी केले आहे.









