ओटवणे / प्रतिनिधी:
पदवीधर प्राथमिक शिक्षक चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी गेली दोन दशके लाखो रुपये खर्च करून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. चंद्रकांत सावंत ओवळीये गावचे सुपुत्र असून ते आंबोलीत राहतात तर मठ प्राथमिक शाळा नं. २ मध्ये पदवीधर शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची सुरूवात फणसवडे सारख्या दुर्गम भागात करून चंद्रकांत सावंत यांनी या दुर्गम गावातील शाळेला जि प चा आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार मिळवून दिला. त्यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना जागतिक, राष्ट्रीय, राज्य ते गाव पातळीपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
चंद्रकांत सावंत यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा ६५ शाळांमधील ८४ विद्यार्थीनी आणि ५ माघ्यमिक हायस्कूल मधील २५ विद्यार्थीनी मिळून एकत्रित ७० शाळांमधील १०९ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना तीन लाख चौवेचाळीस हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. तसेच स्मार्ट डिजीटल शाळा, कायम बक्षिस ठेव योजना, डिटीएच टिव्ही शाळा, मुलांना शुद्ध पेयजल, हँडवॉश स्टेशन , खेळाडू विद्यार्थि, ग्रामीण शाळा वर्गखोली लाइट फिटींग, शाळेसाठी स्कँनर प्रिंटर , दहावी प्रथम द्वितीय तृतीय कायमस्वरूपी बक्षिस ठेव योजना, निराधार मुलांना सहकार्य, नाट्यमंडळ, कलाकार यांना सहकार्य, बालिकांना वाढदिवस भेट, नवोदीत कवींना पुस्तक छपाई सहकार्य, गरजूंना सहकार्य, तसेच महिला व बाल बचतगट व स्थानिक मंडळे यांना आर्थिक मदत,
विद्यार्थीहित आदी उपक्रमांसाठी स्वतः पदरमोड करून त्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. चंद्रकांत सावंत यांनी समाजहितासाठी गेल्या दोन दशकापासून केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन आमदार दिपक केसरकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांचे हे कार्य शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्शवत असल्याचे सांगितले.
Previous Articleमिंगेल मान्येकर याना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Next Article दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या हाती पोहचणार पुस्तके









