बेंगळूर/प्रतिनिधी
जुलैच्या तिसर्या आठवड्यात एसएसएलसी परीक्षा होणार असून पुढील आठवड्यात सुरू होणार्या २०२२-२२ शैक्षणिक वर्षाची तयारी करणाऱ्या शिक्षकांना कोरोना कर्तव्यातून मुक्त करा अशी विनंती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बीबीएमपीला केली आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष सुरू होणार असताना शिक्षकांना कोविड कामावर लावले जात आहे अशा शिक्षकांच्या तक्रारींची दखल घेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस.सुरेश कुमार यांनी जुलैच्या तिसर्या आठवड्यात एसएसएलसी परीक्षा होणार असून शिक्षकांना पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी करायला हवी त्यासाठी त्यांना कोरोना सेवेतून मुक्त करा असे म्हंटले आहे.
शिक्षणमंत्र्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी आणि पुढील महिन्यात होणाऱ्या एसएसएलसी परीक्षांसाठी शिक्षकांची आवश्यकता असल्याचे सांगून आयुक्तांना पत्र लिहून त्यांना कोविड सेवेतून मुक्त करण्याची विनंती केली. बीबीएमपीने शालेय शिक्षकांना घरातील कोविड लसीकरण सर्वेक्षण करण्यासाठी आशा कामगार आणि बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्या बरोबर काम करण्याचे आदेश दिले होते.
मंत्री एस. सुरेश. कुमार यांनी निवेदनात, “शिक्षकांनी शाळांमध्ये लस घेण्याची, प्रवेश घेण्याची आणि शैक्षणिक कामे करण्याची गरज आहे. एसएसएलसी परीक्षांच्या तयारीच्या कामासाठी त्यांच्या सेवा देखील आवश्यक आहेत. या तथ्यांचा विचार करून बीबीएमपीने त्यांना कोविडशी संबंधित कर्तव्यांपासून त्वरित मुक्त केले पाहिजे, ” असे म्हंटले आहे. कुमार यांनी सर्व जिल्ह्यांच्या डीसींना एसएसएलसी परीक्षांच्या कामात भाग घेणार्या सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांना प्राधान्याने लसीकरण करण्याचे निर्देश दिले.