वाई : तालुक्यामध्ये वाढत चालेला कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विनय गौडा यांच्या सुचनेनुसार वाईचे गटविकास अधिकारी उदकुमार कुसूरकर यांनी भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्या पथकातील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, विस्तार अधिकारी विस्तारअधिकारी साईनाथ वाळेकर, विस्तार अधिकारी मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नागेवाडी शाळेचे उपशिक्षक शाहीर शरद यादव, चिंधवली शाळेचे मुख्याद्यापक अनिल जाधव, लाखानगर शाळेचे मुख्याद्यापक उमेश मोरे, वयगाव शाळेचे उपशिक्षक राजेंद्र नलावडे यांच्याकडून वाई तालुक्यात पोवाड्यातून कोरोनामुक्तीचा जागर सुरु करण्यात आला आहे. त्यांनी आतापर्यंत यशवंतनगर, विराटनगर आदी ठिकाणी प्रबोधन केले आहे.
Previous Articleगोवावेस येथील कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू
Next Article शुक्रवारी 1120 रुग्ण पॉझिटिव्ह









