प्रतिनिधी / वाकरे
शिंदेवाडी (ता. करवीर) येथील ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या थेट संपर्कातील ४९ जणांचे स्वॅब टेस्टसाठी घेतल्यानंतर सोमवारी दुपारी आलेल्या अहवालात हे सर्व जण निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
अवघी १५०० लोकसंख्या असलेल्या शिंदेवाडी गावाला गेल्या आठवडयाभरात कोरोनाचे तीन मोठे धक्के बसले होते. सोमवारी येथील एक पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता. यानंतर त्यांचा बारा वर्षीय पुतण्या पॉझिटिव्ह झाला. तर या मुलाच्या संपर्कात आलेल्या एकुण ३५ मुलांपैकी ८ मुले पॉझिटीव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.
शुक्रवारी या सर्व मुलांच्या थेट संपर्कात आलेल्या ४९ जणांची टेस्ट घेण्यात आली होती. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.सध्या गावात कोरोना बाधितांची संख्या १० असून ८४ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
Previous Articleहिमाचल प्रदेशात 25 टक्के बस भाडे वाढविण्यास मंजुरी
Next Article जगभरात 87.52 लाख रुग्ण कोरोनामुक्त








