जपानच्या पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ राहिल्याच्या विक्रम प्रस्थापित करणारे शिंझो आबे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास आठवडा पूर्ण झाला. राजीनाम्याचे कारण आजारपण असल्याचे त्यांनी सांगितले. खरे म्हणजे कोणत्याही देशाचा प्रधानमंत्री ‘आजारपणाचे’ कारण देऊन पदत्याग करतो ही घटना फार दुर्मिळ म्हणावी लागेल. अशी उच्चपदस्थ माणसे आपल्या खुर्चीवरून पायउतार होतात ती सहसा तीन कारणांनी. एक-निवडणुकीतील पराभव, दोन-मृत्यू, आणि तीन सरकार अल्पमतात येणे. याखेरीज चौथे कारण भ्रष्टाचाराच्या आरोपाचे असते, पण तेही फार मोठय़ा प्रमाणावर पुढे आल्याचे दिसत नाही. यामुळेच तीन वेळा पंतप्रधानपदी निवडून येऊनही आजारपणाच्या कारणाने राजीनामा देणारे शिंझो आबे जगभरातील प्रसारमाध्यमे आणि राजकीय निरीक्षकांच्या चर्चेचा विषय बनून राहिले.
आबे हे 2006-07 मध्ये प्रथम जपानचे पंतप्रधान बनले. विशेष गोष्ट अशी की त्यावेळीही त्यांनी याच कारणाने पदत्याग केला होता, त्यानंतर 2012 साली पुन्हा निवडून आले, 2017 मध्ये तिसऱयांदा पंतप्रधान बनले. जपानचा कोणताही प्रधानमंत्री इतकी वर्षे सत्तेवर राहिलेला नाही. शिंझो आबे यांच्या पाठीशी राजकारणाचा प्रदीर्घ वारसा आहे. त्यांचे आजोबा नोबुसुके किशी जपानचे पंतप्रधान होते, आणि स्वतंत्र भारताला भेट देणारे ते प†िहले जपानी प्रधानमंत्री होते. स्वतः आबे यांनी एकूण चारवेळा भारत दौरे केले होते. त्यांची पहिली भारत भेट डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात झाली. 22 ऑगस्ट 2007 रोजी त्यांनी भारतीय संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ‘कन्फ्ल्यएन्स ऑफ टू सीज’ अर्थात दोन सागरांचा मिलाफ हे गाजलेले भाषण केले होते. त्या भाषणात भारताचे ‘सहिष्णुता’ आणि ‘शांततेचा पाठपुरावा’ हे दोन गुण अधोरेखित केले होते. कोणत्याही पुढाऱयाप्रमाणे भारताबेराबर करावयाच्या काही मैत्रीपूर्ण करारांबद्दल आणि नव्या मैत्री कार्यक्रमाबद्दल त्यावेळी ते बोलत होते. त्यांचे ते भाषण हे वक्तृत्वाचा आणि वाङ्मयीन रचनेचा उत्तम नमुना म्हणून इतिहासात नोंदवले आहे.
भारत-जपान व्यापारी, औद्योगिक आणि सामरिक सहकार्याबद्दल त्या भाषणात शिंझो आबे यांनी आपल्या कल्पना मांडल्या आणि ‘बृहत्तर आशिया’ (ब्रॉडर एशिया) ही नवी संकल्पना सभागृहासमोर मांडून पॅसिफिक महासागराच्या तीन बाजूंना असलेली जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांच्या परस्पर समुद्री व्यापार व्यवहाराने भारतासारख्या महत्त्वाच्या राष्ट्राला सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला होता. याच भाषणात त्यांनी मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरच्या मुद्याला स्पर्श केला होता. याच भाषणात भारतातील शहरांमध्ये सक्षम मलनिःसारण योजना राबवण्यात जपान देऊ करत असलेल्या सहकार्याचा तपशील मांडला होता. पुढे नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारात ‘गंगा शुद्धीकरण मंत्रालय’ स्थापन केले असले तरी समस्त भारतीयांना परम पवित्र वाटणाऱया गंगामैयाच्या शुद्धीकरणासाठी जपान-भारत सहकार्यातून राबवणाऱया योजनेचा प्रारंभ 2007 सालच्या त्या भाषणाअगोदरच झाला होता, हे शिंझो आबे यांच्या राजीनाम्यानिमित्त होत असलेल्या या लेखातून अधोरेखित करण्यास हरकत नसावी.
शिंझो आबे यांच्या आजारपणाचे वृत्त ऐकून आपणस दुःख झाले असे ट्विट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ही त्यांची स्वाभाविक अभिव्यक्ती होती. राजकारणापलीकडे जाऊन देशोदेशीच्या उच्चपदस्थांशी मैत्री जुळवण्याची नरेंद्र मोदींना आवड आहे आणि राजकारणातील शिष्टाचार बाजूला ठेवून अनौपचारिकपणे ते मैत्रीसंबंध जोपासणे ही त्यांची वृत्ती आहे. त्या न्यायाने मोदींनी आबेंसमवेत काढलेले एक स्नेहपूर्ण छायाचित्र त्या ट्विटसोबत पाठवून दिले.
शिंझो आबे आणि नरेंद्र मोदी हे तसे समान राजकीय विचारसरणीचे नेते. जपानमध्ये आबे यांच्या लिबरल डेमोप्रॅटिक पक्ष (एलडीपी) हा सनातन विचारांचा मानला जातो. जपानच्या अस्सल देशी परंपरांना पूज्य मानणाऱया ‘एलडीपी’समोर तेथील राज्यघटनेचे 9 वे कलम सुधारण्याचे मोठे उद्दिष्ट आहे. दुसऱया महायुद्धातील पराभवानंतर जपानच्या लष्करी शक्तीवर आणि लष्कराच्या वापराच्या क्षेत्रांवर त्या कलमाने मर्यादा घातल्य़ा ते कलम लिहिणाऱयांचे हात अमेरिका आणि विजेत्या पाश्चात्य राष्ट्रांच्या दिग्दर्शनाने चालत होत़े हा इतिहास आह़े तो कलंक पुसण्याचा प्रयत्न शिंझो आबे करत होत़े परंतु प्रदीर्घ कारकीर्द उपभोगूनही तो यशस्वी झाला नाह़ी याउलट, मनमोहनसिंग आणि मोदी या दोन परस्परविरोधी पक्षांच्या भारतीय पंतप्रधानांशी मैत्री टिकवणारे आबे मनमोहनसिंग यांच्या काळात सुरू झालेल्या आणि मोदी कालखंडात पूर्णत्वास गेलेल्या अणु सहकार्याच्या भारत जपान कराराबद्दल जपानमधील विरोधी पक्षीयांचे मन वळवण्यात यशस्वी ठरल़े शिंझो आबे यांच्या राजीनाम्यामुळे 2013 पासून चीनने केलेल्या लष्करी खोडसाळपणात वेळोवेळी भारताच्या बाजूने उभा राहणारा एक मित्र जपानच्या राजकीय पटलावरून दूर झाला आहे हे नक्की!
शिंझो आबे यांनी स्वतःच्या देशात आपली छबी मोठी करण्याचा बऱयापैकी प्रयत्न केल़ा साहसी आर्थिक निर्णय घेऊन शेती, उढर्जा, प्रशासन, श्रमक्षेत्र आणि महिलांची रोजगारी यात संरचनात्मक बदल आणण्याची त्यांची योजना ‘आबेनॉमिक्स’ या नावाने ओळखली जात़े असे असले तरी जपानच्या कारभारात त्यांनी नजरेत भरण्यासारख्या सुधारणा केल्या असे तेथील जनतेला वाटत नाह़ी काही घोटाळय़ांशी त्यांचे नाव जोडले गेल़े जूनमध्ये मते खरेदी केल्याच्या आरोपावरून खुद्द त्यांच्या खासदार पत्नीला अटक करण्यात आली. या सर्व बाबींचा खुलासा न करताच त्यांनी प्रकृतीचे कारण सांगत राजीनामा दिल़ा
सध्या सर्वत्र कळीचा विषय असलेल्या कोरोना संसर्गाचा प्रश्नही त्यांनी सक्षमपणे सांभाळता आला नाही असे साठ टक्के जपानी लोकांना वाटत़े ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने एका लेखाद्वारे प्रदर्शित केलेले मत पाहता शिंझो आबे यांच्या कारकीर्दीचा जपानमध्ये फार चांगला ठसा उमटलेला नाही आणि त्या राष्ट्राच्या इतिहासात त्यांच्याबद्दल खूप गौरवाचे परिच्छेद लिहिले जातील असे दिसत नाह़ी आपल्या उत्तरदायित्वाचा विसर पडून घोटाळे इत्यादीबद्दल काहीच उत्तर न देता आबे यांनी पळ काढला, ही न्यूयॉर्क टाइम्सची शेरेबाजी जपानसारख्या महत्त्वाच्या देशाच्या पुढाऱयांबद्दल गंभीर प्रतिक्रियेचे प्रतिबंब पाडणारी आह़े
राजेंद्रप्रसाद मसुरकर, 9960245601








