प्रतिनिधी / वाकरे
शिंगणापूर (ता.करवीर ) येथे भोगावती नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेला तरुण बंधाऱ्यावर दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातानंतर बंधाऱ्यात पडून वाहून गेला. जयकुमार बाबुराव जाधव ( वय ४०) असे या तरुणीचे नाव आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बुडालेल्या तरूणाचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की चंबुखडी, गोपाळ वसाहत येथील जयकुमार बाबूराव जाधव हा तरूण नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मासे पकडण्यासाठी गेला होता. मासे पकडून झाल्यानंतर घरी परतत असताना सकाळी झालेल्या पावसामुळे चिखलात त्याची दुचाकी घसरली आणि तो पाण्यात पडून वाहून गेला. तो वाहत जात असताना काही प्रत्यक्षदर्शीनी पाहिले. अग्निशमन दलाकडून शोधमोहिम सुरू असून दुपारपर्यंत तरूणाचा शोध लागलेला नव्हता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









