प्रतिनिधी / शिरोळ
दूध उत्पादक ग्राहकांना दोन रुपये जादा मिळावे एकचीच घराणेशाही असु नये येत्या निवडणुकीमध्ये शाहू आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील या शंका बाळगण्याचे कारण नाही असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने माजी आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानी नामदार सतेज पाटील नामदार हसन मुश्रीफ यांनी भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते आमदार प्रकाश आवाडे यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे.
त्याचा फटका कोणाला बसणार याबाबत बोलताना नामदार सतेज पाटील म्हणाले की प्रकाश आवाडे व कल्लाप्पाणणा आवाडे यांच्याशीही चर्चा केली आहे. याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील असे सांगून ते म्हणाले की अमुल दूध संघापेक्षाही गोकुळ दुध संघ सक्षम करण्यासाठी खास प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
उल्हास पाटील ना पाटील, ना मुश्रीफ यांची बंद खोलीत चर्चा
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याशी सतेज पाटील व नामदार हसन मुश्रीफ यांनी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली गणपतराव पाटील यांनी उभयंतायाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









