प्रतिनिधी/कोल्हापूर
शाहूवाडीतील वनाधिकाऱयांची चौकशी करावी, या मागणीसाठी दलित महासंघाने बुधवारी ताराबाई पार्क येथील प्रादेशिक वन कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. मागणीचे निवेदन मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव, सवते, नेर्ले, आकुर्डे उचत येथील लांडोबाचा माळ परिसरात सागवान, बाभुळ लागवड कागदोपत्री दाखवून शासनाची फसवणूक केली. पेंडाखळे येथे वनहद्दीत केबल न काढता केबल काढल्याचा कागदोपत्री खर्च दाखवला आहे. यासंदर्भात वनाधिकाऱयांची चौंकशी करावी, अशी मागणी केली आहे. आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाबासो दबडे, अशोक गायकवाड, आप्पासो कांबळे, अनील मिसाळ, राजू कांबळे, धनाजी पवार, सागर बुरूड, सुनील कोरे, वर्षाराणी कुंभार आदी सहभागी झाले.









