प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर तालुका शाहूवाडी येथील बाजार समितीच्या आवारातील गाळ्यांच्याबाबत प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच तातडीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक कर्णसिंह गायकवाड यांनी मलकापूर येथे आयोजित बैठकीत दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार मलकापूर येथे शहरातील व्यापारी यांची बैठक आयोजित केली होती.
त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रशासक सूर्यकांत पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, सचिव मोहन सालपे, उपसचिव जयवंत पाटील, बांधकाम अभियंते अशोक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना कर्णसिंह गायकवाड म्हणाले की गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे मात्र लवकरच याबाबत निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे व्यापारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून योग्य नियोजनाने या ठिकाणी गाळे सुरु करण्यात येतील.
सूर्यकांत पाटील म्हणाले की या ठिकाणी तात्काळ किमान २० गाळे तयार करणार असून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बाजार वसला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून व्यापारी, आडतदार या सर्वांना सोयीचे होईल अशा पद्धतीने तात्काळ निर्णय घेतला जाईल या बैठकीस सुभाष पाथरे , बंधू भिंगार्डे, उमेश कोठावळे, नगरसेवक सुभाष कोळेकर, सुशांत तांदळे .विजय गांधी, माजी नगरसेवक भगवान सपाटे महेश विभुते दींच्या सह उपबाजार समितीचे कर्मचारी, शहरातील व्यापारी उपस्थित होते.
Previous Articleराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्यात होणार
Next Article बेंगळूरमध्ये कोरोनाचा उच्चांक









