शाहुवाडी /प्रतिनिधी
शाहूवाडी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली असल्याने पंचायत समितीचा कारभार ठप्प झाला आहे. तालुक्यातील सात गावातील नऊ नागरीकांना कोरोनाची लागन झाली आहे.
शाहूवाडी तहसिल कार्यालया बरोबर आता पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात एकूण ३५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पेरीड येथील कोविड सेंटर मध्ये ८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत. आज दिवसभर पंचायत समितीचे सर्व विभागाचे कामकाज बंद होते. मात्र अविरतपणे आरोग्य विभागाचे कामकाज सुरु होते. सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे स्वॅब घेण्यात आले आहेत दरम्यान बांबवडे, शित्तुर – मलकापूर, सरूड, उखळू, चनवाड, परळे आदी गावात रुग्ण सापडले आहेत. तर तालुक्यात आता पर्यत चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मुत्यू झाला आहे.








