वारणा कापशी / प्रतिनिधी
शाहूवाडी तालुका सहयाद्री पर्वतांच्या डोंगररांगा मध्ये वसलेला तालुका आहे. येथे पावसाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे खरीप पिकांच्या सर्व पेरण्या ह्या धुळवाफ पेरण्या होत असतात. मान्सुनचा पाऊस सात जूनला वेळेत हजर होणार या अपेक्षेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात, भुईमुंग सोयाबीन, ज्वारी इत्यादी खरीप पिकांच्या धुळवाफ पेरण्या पुर्ण करुन घेतल्या. गेल्या आठवडयात समद्रातील चक्रीवादळ व हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वळीव स्वरूपाच्या पावसाने अशी काय सुरवात केली की, मान्सुन येवुन मृगाच्या पावसाच्या भितीने उरल्यासुरलेल्या पेरण्यासुध्दा शेतकऱ्यांनी पुर्ण केल्या. पेरण्या पुर्ण करुन आठवडा ऊलटला तरी मान्सुनच्या पावसाची चाहूल लागेना. म्हणून शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसला आहे. ज्या शेतकऱ्यांची पिकाला पाणी देण्याची सोय आहे त्यांनी भातपिकास पाणी दिले आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यातील पुराच्या भितीने नदीवरील मोटारी लवकरच काडून घरी आणल्या आहेत. त्यामुळे त्यांना भातपिकास पाणीही देता आलेले नाही. आता तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष मृगाच्या पावसाकडे लागलेले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








