प्रतिनिधी / शाहुवाडी
शाहूवाडी तालुक्यातील सहा गावात कोरोना बधित रुग्ण सापडल्यामुळे कंटेनमेंन्ट झोन म्हणून उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी दहा गावे जाहीर केली आहेत. तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या १९६ वर पोहचली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, माण, वडगाव ,आरुळ, खुटाळवाडी, सुपात्रे, या गावात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत . त्यामुळे प्रशासनाने मलकापूर, माण या दोन्ही गावांच्या तीन किलो मीटर च्या हददीतील उचत, परळे ,येलुर पैकी जाधववाडी ,पेरीड, कोपार्डे , शाहूवाडी ,चनवाड, शिरगाव ,करंजोशी ,ओकोली, येळाणे ही गावे कंटेनमेंट झोन म्हणून जहिर केली आहेत . कोरोना विषाणूचा समुह संसर्ग सुरु झाला असून नागरीकांनी गर्दी करू नये सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा असे आवाहन तालुका वैधकीय अधिकारी डॉ. एच आर निरंकारी यांनी केले आहे. मलकापूर नगर परिषदेच्या वतीन ही शहरात विशेष खबरदारी घेतली असून विना मास्क घालून फिरणारे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
Previous Articleपुणे विभागातील 32,634 रुग्ण कोरोनामुक्त!
Next Article अब्दुल लाट सरपंच अपात्र








