शाहुवाडी/प्रतिनिधी
सावर्डे खुर्द तालुका शाहुवाडी येथे शैलजा अरविंद पाटील (वय 3४) या विवाहितेचा पतीने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली असून मयत शैलजा पाटील यांचे मूळ गाव माले तालुका पन्हाळा येथील असून त्या सावर्डे प्राथमिक उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या या घटनेने तालुक्यात चांगलीच खळबळ माजली आहे.
गुरूवार २८ मे रोजी पती पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. मध्यरात्री पतीने शैलजाचा दोरीने गळा आवळून तिचा खून केला. तिला हर्ष (वय१०) व राजवर्धन (वय६) अशी दोन मुले आहेत. हर्ष चौथीत शिकत आहे. तर राजवर्धन यावर्षी पहिलीत प्रवेश घेणार होता. पती अरविंद पाटील हा मलकापूर, बांबवडे व शाहूवाडी येथे लिंबू विक्रीचा व्यवसाय करत होता. मृत शैलजाचे माहेर गोटखिंडी ता. वाळवा तर सासरे माले ता पन्हाळा हे आहे.तिच्या मृत्यूमुळे दोन्ही मुले आईला पोरकी झाली आहेत.या दुर्दैवी घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मीच तीचा गळा आवळून खून केल्याची कबुली पती अरविंद पाटील यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली आहे. पतीस पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोनि प्रविण चौगुले व सपोनि भालचंद्र देशमुख करित आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








