प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील पालिकेचे शाहु कला मंदिराच्या नुतनीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. हे काम सुरु असल्याने साताऱयातील रंगकर्मीना सभागृह प्रयोगासाठी मिळत नव्हते. हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी स्वतः उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कामाच्या ठिकाणी भेट दिली अन् काम पंधरा दिवसात कसल्याही परिस्थिती पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे साताऱयातील रंगकर्मीना लवकरच शाहु कला मंदिर प्रयोगासाठी खुले होणार आहे.
साताऱयातील छत्रपती शाहु कला मंदिराच्या नुतनीकरणाचे काम लॉकडाऊनपूर्वी हाती घेण्यात आले होते. हे काम लॉक डाऊनमध्ये तांत्रिक कारणास्तव बंद पडले होते. परंतु पुन्हा लॉकडाऊन संपल्यानंतर पालिकेने सुचना देताच कामाला प्रारंभ झाला आहे. शाहु कला मंदिराच्या नुतनीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, याकरता सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी नुकतीच त्या शाहु कला मंदिराच्या कामाच्या ठिकाणी जावून भेट दिली. कामकाजाची पाहणी केली. अभियत्यांना सुचना दिल्या. चांगले काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करा. जेणे करुन साताऱयाच्या रंगकर्मीना लगेच उपलब्ध होईल, अशा सुचना दिल्या. त्यामुळे पंधरा दिवसात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
गळती काढण्याकरिता सहा पथके उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी नेमली आहे. ही पथके सक्रीय असून दररोज सकाळी स्वतः उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे या पथकांकडून आढावा घेत आहेत. जेथे अडचण भासेल तेथे ते स्वतः जातात. फुटक्या तळय़ाच्या परिसरात रस्त्यावर गळती लागलेल्या ठिकाणी ते जावून त्यांनी स्वतः उभे राहून गळती काढून घेण्याचे काम केले. त्यांनी केलेल्या कामांचे कौतुक होत आहे.








