मृताचे दोन हात सुतळीने बांधल्याचे पोलीसांना आढळले
प्रतिनिधी / शाहुवाडी
कासार्ड पैकी खेळते धनगरवाडा तालुका शाहुवाडी येथील युवक प्रकाश धोंडीबा कोळापटे वय 22 या युवकाने विहिरीच्या पाण्यात आत्महत्या केली असल्याची नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे.
पोलीसातुन मिळालेली महितीनुसार ऐनवाडी गावच्या हददीतील वसंत पाटील यांच्या मालकीच्या विहिरीत प्रकाश कोळापटे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ग्रामस्थांनी याची महिती पोलीसांना देण्यात आली. सदर घटनेचा पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह विहिरीतुन वर काढला असता मृत प्रकाश कोळापटे याचे दोन हात सुतळीने बांधले होते. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख करीत आहेत.









