प्रतिनिधी / शाहुवाडी
खुटाळवाडी ता.शाहूवाडी येथील ४७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या खासगी डॉक्टरच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या ३५ जणांना तालुका आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले आहे.
बांबवडेतील एका खासगी हॉस्पीटल व स्वतःच्या ओ.पी.डी. ते कार्यरत होते. आज प्रशासनाने त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेले कुटूंबातील व्यक्ती,बांबवडे हॉस्पीटल मधील त्यांचे सहकारी,उपचार केलेले रूग्ण आदी ३५ जणांना क्वारंटाईन केले आहे.त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. गेल्या पंधरा दिवसात या डॉक्टर च्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतः पुढे येऊन तपासणी करून घ्यावी.असे आवाहन तालुका गटविकास अधिकारी अनिल वाघमारे व वैद्यकीय अधिकारी एच.आर.निरंकारी यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








