प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरातील एका महिलेचे एटीएम कार्ड व इतर कागदपत्र बस स्थानकाच्या परिसरातून गहाळ झाले होते. त्या एटीएमवर पिन नंबर लिहून ठेवला होता. अज्ञाताने त्या पिनचा वापर करून त्या महिलेच्या खात्यातील 47 हजार 500 रुपये काढल्याची तक्रार झाली होती. त्यावरून शाहूपुरी पोलिसांनी तपास केला असता करंजे नाका येथील एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी संशयित आढळून आला. त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडुन 28 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली आहे.









