ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूरने आपला आगामी सिनेमा ‘जर्सी’चे उत्तराखंडमधील शूटिंग पूर्ण केले आहे. याबाबतची माहिती शाहिद कपूरने याची माहिती ट्विट करत दिली. तसेच आपल्या ट्विट मध्ये शाहिदने उत्तराखंड सरकाराचे आभार देखील मानले आहेत.
शाहिद कपूरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, जर्सीचे उत्तराखंडमधील शेड्यूल पूर्ण झाले आहे. मी उत्तराखंड सरकारचे आभार मानतो, त्यांनी आम्हाला राज्यातील अनेक सुंदर ठिकाणी चित्रपटाचे शेड्यूल सुरक्षितपणे शूट करू दिले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. मृणाल ठाकूरने देखील राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
दरम्यान, गौतम तिन्नानोरी दिग्दर्शित ‘जर्सी’ सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.