कहाणी पूरी फिल्मी हैं असं हलकं- फुलकं वाक्य म्हणणारी आणि वाक्याप्रमाणे वावरणारी, स्वत: मधील अभिनयाच्या टॅलेंटमुळे अनेकांची फेव्हरेट असणारी ही व्यक्ती म्हणजे पृथ्विक प्रताप. त्याने स्वत: च्या हिमतीवर, कौशल्यावर आणि मेहनतीने आणि ध्येयाने त्याने त्याचे नाव मोठे केले आहे.
अभिनयाची आवड असणाऱया पफथ्विक प्रतापने मराठी मालिका, सिनेमा, नाटक, लघुपट, वेबसिरीज इत्यादी माध्यमांत काम केले आहे. अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांत पफथ्विकने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आंबट गोड, जागो मोहन प्यारे, हम बने तुम बने या मराठी मालिकांचाही तो प्रमुख हिस्सा होता. इतकेच नव्हे तर सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व 2 या कार्यक्रमात पफथ्विकने सहभाग घेतला होता आणि तो दुसऱया पर्वाचा विजेता देखील ठरला. तसेच त्याने नाईट स्कूल, प्यार वाली लव्ह स्टोरी या सिनेमांतही काम केले आहे. मालिका, सिनेमा, नाटक या तीन मंचावर प्रेक्षकांची मने जिंकत त्याने वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन करण्यास सुरुवात केली. त्यात त्याने मराठी बॅक बेंचर्स आणि हिंदी लाखों में एक – 2 या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. आता लवकरच प्रेक्षकांना, पफथ्विक एका नवीन सिनेमात दिसणार आहे. नेटफिल्क्सवरील 17 सिनेमांची घोषणा केली आणि या सिनेमांच्या यादीत पफथ्विकचा ही सिनेमा आहे ज्यामध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारतोय आणि त्या सिनेमाचं नाव आहे क्लास ऑफ 83.
रेड चिलीझ् एंटरटेनमेंट प्रॉडक्शन, अतुल सभरवाल दिग्दर्शित आणि शाहरुख खान, गौरी खान, गौरव वर्मा निर्मित क्लास ऑफ 83 या सिनेमात मराठमोळा अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणे ही मराठी सिनेसफष्टीसाठी आणि प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सिनेमात पफथ्विक, बॉबी देओल, अनुप सोनी, भूपेंद्र जाडावत, निनाद महाजनी, हितेश भोजराज आणि समीर परांजपे या दिग्गज कलाकारांसोबत क्रिन शेअर करणार आहे.









