दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री नयनतारा लवकरच बॉलिवूड चित्रपटांमधून झळकणार आहे. तिचे बॉलिवूड पदार्पण सुपरस्टार शाहरुख खानसोबत होणार आहे. दिग्दर्शक अटली स्वतःच्या हिंदी दिग्दर्शकीय पदार्पणात शाहरुख आणि नयनतारा यांच्यासोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. नयनताराने अलिकडेच या चित्रपटासाठी रितसर करार केला आहे.
या चित्रपटात शाहरुखसह कन्नड अभिनेता सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. तमिळ चित्रपट मर्सेलचा हा हिंदी रिमेक असणार आहे. शाहरुखच्या जन्मदिनी या चित्रपटाची घोषणा होणार असल्याचा अंदाज आहे.
अटलीसोबत शाहरुखचा हा पहिला चित्रपट असणार आहे. तर नयनताराचा अटलीसोबतचा हा तिसरा चित्रपट ठरणार आहे. नयनतारा यापूर्वी मुकुथी अम्मान या विनोदी तमिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. यात तिने एका देवीची भूमिका साकारली होती. तमिळ थ्रिलर नेत्रीकन्न चित्रपटातून ती लवकरच दिसून येणार आहे. हा चित्रपट कोरियन थ्रिलर ब्लाइंडचा रिमेक आहे.









