वार्ताहर / टोप
कृषि विभागाने प्रमाणीत केलेले ७० टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असलेले बियांने शेतकर्यांनी पेरणी करावी. ज्या शेतकर्यांची शेतात बियांणे उगवुन आलेले नाही त्यांना बियाणे देऊ असे उपविभागीय कृषि आधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी टोप येथे सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी जी.एस. गोरे ,मंडळ कृषी अधिकारी संतोष पाटील, महादेव जाधव टोप गावातील शेतकरी उपस्थित होते .
कृषी विभागाच्या वतिने महाबीज व काही खाजगी कंपनीचे बियांणे शेतकर्यांनी पेरणि केली होती. बियांणे उगवण झाले नसलेने तक्रार होती. यावर आज उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी व तालुका कृषी अधिकारी जी.एस. गोरे प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर भेट दिली व पाहणी केली. असता तक्रारदार शेतकरी यांचे ६०ते ७०% उगवण झालेचे दिसून आले तसे कुलकर्णी यांनी शेतकरी यांना ज्या शेतकर्यांचे बियाणे उगवन झाली नाही त्यांनी कृषि धिकारी यांचकडे अर्ज करावे त्यानुसार तालुका स्तरीय समिति यांचे समवेत पहाणी करून संबंधित शेतकरी यांना नुकसान भरपाई संबंधित बियाणे वितरण करणारा कपंनी कडून देणेची माहीती दिली. बियांणे ची उगवण प्रात्यक्षिक करून बियाणे पेरणीचा सल्लाहि शेतकरी बंधुना दिला.
यावेळी कासारवाडी मौजे तासगांव येथे सोयाबीन , भुईमुग पिकांची पाहणी केली . निवास पाटील ,आनंदा चौगुले, शंकर वागवे, आनंदा पाटील यांचेसह शेतकरी उपस्थित होते. टोप येथे सोयाबिन पिकाची पाहणी करताना उपविभागीय कृषी आधिकारी मकरंद कुलकर्णी, तालुकाकृषी आधिकारी जी.एस.गोरे,संतोष पाटील, महादेव जाधव, निवास पाटील आदि उपस्थित होते.