मुदाळतिट्टा /प्रतिनिधी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खायचे धोरण ठरवले असून त्याच धोरणाचा भाग म्हणून आता शेतकऱ्यांच्या परवानगी शिवाय त्यांचे उस बील महावितरण कंपनीच्या वसुलीसाठी द्यायचा असा निर्णय घेत आहे. हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत या सरकारला स्वस्थ बसु देणार नाही . सरकारला गुडघे टेकायला लाऊ असा इशारा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या परवानगी शिवाय त्यांचे उसबील परस्पर कारखान्याकडून महावितरणकडे पाठवण्याचा निर्णय हे सरकार घेत आहे. या शासन निर्णयाची होळी मुदाळ तिट्टा ता. भुदरगड येथे करण्यात आली,त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री काळे पुढे म्हणाले, ही विकास आघाडी नसुन वसुली आघाडी आहे. म्हणूनच आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मिळणाऱ्या उसाच्या बिलावर डोळा आहे. पण भारतीय जनता पक्ष व किसान मोर्चाने या विरोधात आंदोलनाची सुरवात कोल्हापूर जिल्ह्यातुन केली असुन त्याचा वणवा महाराष्ट्र भर पेटल्या शिवाय रहाणार नाही.
यावेळी उसबील वसुलीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली व सरकारच्या निषेधाच्या घोषणा देणेत आल्या. याप्रसंगी माधवी नाईक, नाथाजी पाटील,भगवान काटे, हंबीरराव पाटील, राजेश पाटील यांची भाषणे झाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









